Talegaon Dabhade : विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न

एमपीसी न्यूज – नीळकंठ नगर, मारूती मंदिर चौक,तळेगाव दाभाडे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा दहावा ( Talegaon Dabhade) वर्धापन दिवस मंगळवारी (दि. 14) साजरा करण्यात आला. यानिमित्त शास्त्रीय गायन,भजन, कीर्तन असे विविध सांप्रदायिक कार्यक्रम पार पडले.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नीळकंठ नगर,मारूती मंदिर चौक,तळेगांव दाभाडे येथे मंदिराच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त,विविध सांप्रदायिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 पहाटे 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत काकडा आरती, महापूजा, अभिषेक करण्यात आला. सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत संगीत साधना भजनी मंडळ,वरदायिनी महिला भजनी मंडळ,कृष्णाई महिला भजनी मंडळ,राही रूक्मिणी भजनी मंडळ इत्यादींनी भजन सेवा केली.दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंत महाप्रसाद देण्यात आला.

Pimpri : पवना धरणात 28.93 टक्के पाणीसाठा, कधीपर्यंत पुरेल पाणी?

सायंकाळी पाच ते सहा रेणुका महीला भजनी मंडळ यांचा हरिपाठ झाला.विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित किरण परळीकर,नारदीय कीर्तनकार शेखरबुवा व्यास, सर्वश्री हभप शांताराम महाराज जावळेकर, गणेश महाराज मोहिते, हभप हर्षल दांगले, हभप अभिषेक थोरात महाराज, गुरुदत्त भजनी मंडळ,निवृत्ती महाराज काकडे भजनी मंडळ यांचे सुश्राव्य अभंगवाणी गायन ( Talegaon Dabhade) झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.