Talegaon Dabhade : सीएसआर मधून होणार कलापिनी संस्थेची विविध कामे 

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरातील नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या ( Talegaon Dabhade) कलापिनी संस्थेची विविध कामे सीएसआर निधीतून केली जाणार आहेत.रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि पॉस्को कंपनी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या कामांचे पॉस्कोचे मुख्य संचालक गुनबे किम व मिंहो जो यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 

या वेळी सचिन मरकळे,पृथ्वीराज देसाई,प्रदीप देशमुख,सचिन देशमुख.रोटरी क्लबचे सचिव श्रीशैल मेंन्थे,महेश महाजन, यादवेंद्र खळदे,दीपक शहा,विलास जाधव,जयवंत देशपांडे,दीपक गांगोळी,राजेंद्र पोळ,प्रभाकर निकम, धनंजय मथुरे,राजू गोडबोले,अतुल हंपी,प्रसाद मुंगी, हृषिकेश कुलकर्णी,सुचित्रा कुलकर्णी, नीता देशपांडे व प्रमोद दाभाडे तसेच कलापिनीचे संस्थेचे श्रीशैल गद्रे, विनायक भालेराव,मधुवंती रानडे,. श्रीपाद बुरसे,ऋचा पोंक्षे,अशोक बकरे,रश्मी पांढरे उपस्थित होते.

 

Mahalunge : मित्राचा खून करणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेश मधून अटक

 

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून व पॉस्को कंपनीच्या व्यावसायिक,सामाजिक जबाबदारी निधी(C S R fund) मधून कलापिनी संस्था येथे करण्यात आलेल्या विविध कामांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले नाट्य संकुल येथील मुख्य पडदा यंत्रणा,झालर वरील भागातील रेलिंग,सोलार पॅनल व इतर कामांचा यामध्ये समावेश आहे.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कलापिनी बालभावनच्या लहान मुलांनी नृत्य सादर केले.प्रास्ताविक करत असताना रोटरी अध्यक्ष रो उध्दव चितळे यांनी विविध शालेय,आरोग्य,नैसर्गिक अप्तीन मध्ये आपण काम केले आहे पण एका सांस्कृतिक व नाट्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थेबरोबर काम करण्याचा रोटरीचा आपला पहिला अनुभव होता असे सांगितले.

 

विश्वस्त डॉ अनंत परांजपे यांनी मुलांमध्ये नाट्य,नृत्य व आपल्या संस्कृतीबद्दल आपुलकी वाढावी म्हणून कलापिनी संस्था कायम आग्रही असते आणि या संस्थेच्या विस्तारामध्ये अनेकांचा हात आहे आणि पॉस्को व रोटरी या दोन्हीनी केलेल्या कामाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे असे सांगितले.  ” पॉस्को  “कडने बोलताना नेहा वाघचौडे, अमोल बुद्धखळे यांनी आपण लहानणापासून कलापिनीशी जोडलेलो आहोत व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व आपल्या पॉस्कोच्या माध्यमातून आपल्याला या कामाचा भाग होता आला याचे समाधान असल्याचे सांगितले.

 

आभार कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर व रोटरीचे उपाध्यक्ष कमलेश कार्ले यांनी ( Talegaon Dabhade) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.