Talegaon Dabhade : कलापिनीमध्ये सोमवारी रंगणार ‘वर्षान्त 2018’

एमपीसी न्यूज- कलापिनी अणि कृष्णराव भेगडे प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ‘वर्षान्त 2018’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवारी (दि. 31) संध्याकाळी 6 वाजता कलापिनी सांस्कृतिक केंद्र येथे होणार आहे. या उपक्रमाचे हे 17 वे वर्ष आहे.

या कार्यक्रमात मावळ, पिंपरी चिंचवड़ अणि पुणे येथील 20 हून अधिक संस्था सहभागी होणार असून 250 हून अधिक कलाकार नृत्य, संगीत, बॉडी बिल्डींग शो असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. यंदाचा वर्षान्त2018 सन्मान पुरस्कार गणेश मोफत वाचनालयाचे लेखक प्रभाकर ओव्हाळ अणि गायक अणि संगीतकार विनायक लिमये यांना समारंभाचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

या शिवाय कलापिनी कॅलेंडर 2019 चे प्रकाशन होणार आहे. सांस्कृतिक वातावरणात मावळत्या वर्षाला निरोप अणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्व रसिकांनी अवश्य यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.