Talegaon Dabhade : श्रीगणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयाच्या अध्यक्षपदी विक्रम दाभाडे यांची निवड

एमपीसी न्यूज : – तळेगाव दाभाडे येथील शतकोत्तर वाटचाल करत असलेल्या श्रीगणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयाच्या अध्यक्षपदी विक्रम किसनराव दाभाडे यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत (Talegaon Dabhade) ही निवड करण्यात आली आहे. या वाचनालयाला 105 वर्ष पूर्ण झाली आहेत.

 

सुमारे 105 वर्षाची वाटचाल सुरु असलेल्या या श्रीगणेश मोफत वाचनालयामध्ये जवळजवळ 6०० सभासद आहेत. एमपीएससी, यूपीएससी,पीएसआय,रेल्वे आदी स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी सुसज्ज अभ्यासिका गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी कार्यरत(Talegaon Dabhade) आहे.अनेक विद्यार्थी या अभ्यासिकेत अभ्यास करून यशस्वी झाले आहेत.

 

संचालक कमिटीने २०२४-२५ या वर्षासाठी निवडलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

अध्यक्ष -विक्रम दाभाडे
उपाध्यक्ष- दिनेश कुलकर्णी
चिटणीस- हर्षल गुजर
खजिनदार- यतीन शहा
अभ्यासिका विभाग प्रमुख – प्रशांत दिवेकर
हिशोब तपासणीस – पद्मनाभ पुराणिक

 

वरील सर्व सदस्यांची निवड एकमताने  करण्यात आली असून या निवडीचे श्रीगणेश मोफत वाचनालयाच्या वाचक वर्गाकडून स्वागत करण्यात आले.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share