Talegaon Dabhade : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सवास सुरुवात

एमपीसी न्यूज – तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा चैत्र शुध्द प्रतिपदा गुढीपाडव्याच्या (Talegaon Dabhade) सार्वत्रिक उत्सवास सुरुवात झाली. 22 ते 25 मार्च पर्यत विविध धार्मिक, सांस्कृतिक, कुस्ती स्पर्धा, बैलगाडा स्पर्धा या उत्सवात होणार असून ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा अभिषेक व पूजा उत्सव समितीचे अध्यक्ष प्रणव भेगडे व उत्सव समिती पदाधिकारी यांच्या हस्ते करून उत्सवाची सुरुवात झाली.
यामध्ये आज (दि.22) मार्च बारा मावळाचा आवडता बैलगाडा शर्यतीचा खेळ दि.22 व 23 मार्च रोजी गणपतीमाळ, तळेगाव दाभाडे येथे भव्य बक्षिसाच्या व्दारे संपन्न होणार आहे.
सायंकाळी ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांची विविध वाद्याच्या गजरात पालखी मधून ग्रामप्रदक्षिणा, रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम – दि. 22 रोजी – तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा ( घोरावडी स्टेशन मैदान), गुरुदेवदत्त प्रासादिक नाट्यरूपी रंगीत संगीत भजनी भारुडाचा कार्यक्रम श्री डोळसनाथ महाराज मंदिरा समोर होणार आहे.
Talegaon Dabhade : दत्तात्रय गायकवाड यांची महाराष्ट्र भाजपा कामगार सेलच्या सचिव पदी नियुक्ती
दि. 24 मार्च रोजी दुपारी यात्रेकरूंची भांडाराच्या रूपाने भोजनाची व्यवस्था, तसेच सायंकाळी घोरावाडी रेल्वे स्टेशन जवळील मैदानात दुपारी 3 च्या पुढे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात येणार आहे. यासाठी एकून5 लाख 5हजार 555 रुपया पर्यंत बक्षिसे ठेवली आहेत. तसेच चांदीच्या गदा, आदि रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहे व महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व इतर मान्यवर पैलवानाचा यावेळी आखाड्यात सन्मान करण्यात येणार आहे.
दि.24 रोजी – बारा गावाच्या बारा अप्सरा ऑर्केस्ट्रा ( मारुती मंदिर चौक), दि.25 रोजी – मदमस्त अप्सरा ऑर्केस्ट्रा (श्री डोळसनाथ महाराज मंदिरा समोर) होणार आहे.
मावळ तालुक्यामध्ये नावलौकिक प्राप्त झालेला हा ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा उत्सव असतो. तरी डोळसनाथ महाराज उत्सव समिती यांनी केलेल्या आवाहना नुसार सर्वांनी सहभागी होऊन उत्सवाचा आनंद लुटावा असे (Talegaon Dabhade) आवाहन समिती कडून करण्यात आले आहे.