Talegaon Dabhade : जुन्या पिढीतील नामवंत व्यापारी विनोदकुमार शहा यांचे निधन

एमपीसी न्यूज – जुन्या काळातील नामवंत व्यापारी विनोदकुमार मोतीलाल शहा (वय ८६) यांचे काल (मंगळवारी) रात्री साडेआठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

तळेगावमधील जैन मंदिराचे ते माजी विश्वस्त तर किराणा भुसार व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष होते. विनोदकुमार शहा यांच्या मागे पत्नी तळेगावच्या माजी नगराध्यक्ष शशिकला शहा, मुलगा लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल, नामवंत उद्योजक, प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे सचिव दीपक शहा तसेच दोन दोन सुना, पाच नातवंडे व पाच पतवंडे असा परिवार आहे.

विनोदकुमार शहा यांच्या पार्थिवावर तळेगाव येथील बनेश्वर स्मशानभूमीत आज (बुधवार) सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

काही महिन्यांपूर्वी विनोदकुमार शहा यांचे द्वितीय पुत्र व नामवंत उद्योजक संजय शहा यांचे कर्करोगाने निधन झाले होते. त्या पाठोपाठ ही दुसरी दु:खद घटना शहा परिवारात घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like