BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : वराळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाल मराठे

0 755
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- वराळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाल तुकाराम मराठे यांची बिनविरोध निवड झाली. सर्वांना बरोबर घेऊन गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त वेळ देणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच विशाल मराठे यांनी निवडीनंतर सांगितले.

सरपंच मनीषा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अभिषेक मराठे, निलेश मराठे, गणेश मराठे, सीमा मराठे, मनीषा मराठे, विकास पवार, प्रियंका भेगडे, अमृता मराठे, जनार्दन पारगे, प्राजक्ता, राजगुरु ,नलीता वाजे, सारिका मांडेकर, अस्मिता मराठे, रुपाली आढाळे आदी उपस्थित होते. उपसरपंचपदासाठी विशाल मराठे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला.निवडणूक निर्णय अधिकारी आचार्य यांनी विशाल मराठे बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. ग्रामसेवक विनोद दुधाळ यांनी त्यांना सहाय्य केले.

सर्वांना बरोबर घेऊन गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त वेळ देणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच विशाल मराठे यांनी निवडीनंतर सांगितले.

विशाल मराठे यांच्या बिनविरोध निवडीसाठी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, माजी पंचायत समितीचे सभापती धोंडिबा मराठे, तळेगाव स्टेशन विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा माजी सरपंच ज्ञानेश्वर मराठे, माजी सरपंच मनोहर मराठे, विश्वनाथ मराठे, शंकरराव मराठे, तुकाराम मराठे, माजी उपसरपंच काळूराम मराठे, सचिन शेलार, बबनराव मराठे, गणपत मराठे, तळेगाव स्टेशन विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन ज्ञानेश्वर मराठे यांनी प्रयत्न केले.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3