Talegaon Dabhade : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल धुमाळ यांचे निधन

एमपीसी न्यूज- वारंगवाडी मावळ येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गोविंद धुमाळ (वय 65) यांचे आज, गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ, बहीण, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता वारंगवाडी येथे इंद्रायणी नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. युवा उद्योजक विनोद धुमाळ व रामनाथ (पप्पू) धुमाळ यांचे वडील तर बाळासाहेब धुमाळ व हभप तुकाराम धुमाळ यांचे बंधू तर गुणवंत कामगार दत्तात्रय धुमाळ यांचे ते चुलते होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.