Talegaon Dabhade : विठ्ठल परिवार मावळच्या अध्यक्षपदी हभप गणेशमहाराज जांभळे यांची निवड

एमपीसी न्यूज- विठ्ठल परिवार मावळच्या अध्यक्षपदी कीर्तनकार व प्रवचनकार हभप गणेशमहाराज सुरेश जांभळे यांची, श्री विठ्ठल मंत्र जप समितीच्या अध्यक्षपदी कीर्तनकार व प्रवचनकार हभप नितीनमहाराज कृष्णाजी काकडे यांची तर विठ्ठल परिवार मावळ कीर्तन महोत्सव समिती अध्यक्षपदी प्रवचनकार हभप दिलीपमहाराज खेंगरे यांची निवड करण्यात आली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांचे मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे.

शिवचरित्र कथाकार हभप धर्मराजमहाराज हांडे व खासदार श्रीरंग बारणे यांचे हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. कीर्तन महोत्सवाची सांगता होत असताना काल्याच्या किर्तनात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

यावेळी बोलताना सुनील शेळके म्हणाले की, गोरगरीब माऊलींसाठी कामे करणे, वारकरी बांधवासाठी संघटनात्मक व भरीव कार्य करणे हे आमचे उद्दिष्ट असून दिलीप खेंगरे व दत्तात्रय केदारी हे विशेषतः जास्तीत जास्त सभासद नोंदणीवर भर देणार असून संघटनात्मक कार्य वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विठ्ठल नामाच्या जपाचा महिमा गावोगावी पोहोचवून त्याचा घरोघरी चिंतन, मनन, वाचन झाले पाहिजे. श्री विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. संतानीही विठ्ठल नामाचा जप करायला सांगितलेला आहे. कलियुगात नामचिंतनात मोठी ताकद आहे. नामजप हे कलियुगात फार मोठे साधन आहे असे नितीन महाराज काकडे म्हणाले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like