Talegaon Dabhade : व्याख्याते विवेक गोविंद गुरव यांना मावळरत्न पुरस्कार

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील प्रसिद्ध व्याख्याते विवेक गोविंद गुरव यांना ओबीसी भटके मुक्ती महासंघाच्या वतीने नुकताच राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य संत गाडगे महाराज पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गुरव यांना आमदार संजय तथा बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मावळरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्याचे राज्य शिष्टाचार गृहराज्यमंञी राम शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विवेक गुरव हे आपल्या संभाषण कौशल्य वर्गातून भाषण कला, स्टेज डेरिंग, निवेदन, वक्तृत्व याचे प्रशिक्षण देतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.