Talegaon Dabhade : जायंटस् ग्रुपतर्फे मतदान जनजागृती फेरी

एमपीसी न्यूज- जायंटस् ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे, जायंट्स ग्रुप ऑफ मावळ सखी, यंग जायंट्स ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 19) संध्याकाळी तळेगाव शहरातून मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. अध्यक्ष अण्णाराव कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे फेरी काढण्यात आली.

मराठा क्रांती चौक, मुख्य स्टेशन चौक, रेल्वे स्टेशन चौक, शिवाजी महाराज चौक अशा सर्व रहदारीच्या ठिकाणी पोस्टर्स, घोषणा, मतदारांसाठी शपथ अशा सर्व माध्यमांतून जनजागृती करण्यात आली. भारतीय लोकशाही परंपरेचे जतन करत; मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात, निर्भयपणे, तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या प्रभावाखाली न येता व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ देण्यात आली.

या जनजागृती फेरीमध्ये जायंटस् ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गोंदेगावे, माजी अध्यक्ष ॲड देविदास टिळे, जनसंपर्क अधिकारी सुमित पारखे, संचालक सदस्य प्रवीण पाटील, दीपक पंडित, शैलेश सिंग, सुनील साखरे, बाळासाहेब जामदार, राजेश बारणे, जायंट्स गृप ऑफ मावळ सखीच्या अध्यक्षा जयश्री टिळे, सचिव सुप्रीया पारखे, उपाध्यक्ष राजश्री गोंदेगावे, खजिनदार वर्षा जामदार, जनसंपर्क अधिकारी नाजुका पाटील, संचालक सदस्य अनुराधा जोशी, यंग जायंट्स ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष विराज कोळी, सचिव मृदुला बोत्रे, खजिनदार तन्मय जामदार, सदस्य मृन्मयी जामदार, रुचिका पारखे, यश गोंदेगावे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस, पत्रकार जगन्नाथ काळे तसेच अनेक जागरूक नागरिक सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.