Talegaon Dabhade: महिलेला महागात पडले ‘वॉकिंग’; चोरट्याने लाखाचे मंगळसूत्र नेले हिसकावून

Walking' cost a woman dearly; The thief snatched the lakh mangalsutra

एमपीसी न्यूज – पतीसह वॉकिंग करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील एक लाख रूपयांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी कातवी ( ता. मावळ) येथे घडली.

याप्रकरणी शैलेजा श्रीनिवास कुलकर्णी (वय 54, रा. कातवी रोड, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कुलकर्णी या शुक्रवारी सायंकाळी पतीबरोबर पायी वॉकिंगसाठी बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील 1 लाख 9 हजार 345 रूपयांचे मंगळसूत्र हिसकावले आणि चोरटे पसार झाले.

फौजदार कोळी तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.