Talegaon Dabhade : विभागीय वेटलेफ्टिंग स्पर्धेमध्ये इंद्रायणी महाविद्यालयाच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

एमपीसी न्यूज- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विभागीय वेटलेफ्टिंग स्पर्धेमध्ये इंद्रायणी महाविद्यालयाचे चिराग वाघवले, शुभम क्षीरसागर, चेतना घोजगे व रुचिका ढोरे या खेळाडूंनी पुणे जिल्हा क्रीडा विभागाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धा 27 व 28 सप्टेंबर रोजी सी डी जैन महाविद्यालय, श्रीरामपूर येथे संपन्न झाल्या.

49 किलो वजनी गटात चेतना घोजगे हिने स्नँच प्रकारात 67 किलो वजन तर क्लीन अँड जर्क प्रकारात 85 वजन उचलत प्रथम क्रमांक मिळवला. 81 किलो वजन गटात रुचिका ढोरे हिने स्कॅन प्रकारात 65 किलो वजन तर क्लीन अँड जर्क प्रकारात 90 वजन उचलत प्रथम क्रमांक मिळवला.

96 किलो वजन गटात चिराग वाघवले याने स्कॅन प्रकारात 115 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 147 किलो वजन उचलत प्रथम क्रमांक मिळवला.
शुभम क्षीरसागर याने स्कॅच. प्रकारात 85 किलो तर क्लीन अँड जर्क प्रकारात 110 किलो वजन उचलत द्वितीय क्रमांक मिळवला.

सर्व विजयी खेळाडूंचे तामिळनाडू येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाचे खेळाडू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, संस्थेचे उपाध्यक्ष गोरखभाऊ काळोखे, मुकुंदराव खळदे, खजिनदार चंद्रकांत शेटे तसेच कार्यवाह रामदास काकडे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डाॅ. एस.के. मलघे व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुरेश थरकुडेयांचे मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like