Talegaon Dabhade : नागरिकांच्या शुभेच्छा हिच माझ्या जिद्दिची प्रेरणा -स्वाती दाभाडे

एमपीसी न्यूज – आई-वडिलांचे कष्ट आणि सर्व थरातील नागरिकांच्या शुभेच्छा हिच माझ्या जिद्दिची प्रेरणा राहिली आहे. यापुढे मी आयएएस, आयपीएस होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया राज्यसेवा परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या तळेगाव दाभाडे (माळवाडी) येथील स्वाती दाभाडे हिने बोलताना व्यक्त केली.

राज्यसेवा परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर प्रथमच ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचे दर्शनास आल्या असताना आयोजित सत्कार प्रसंगी दाभाडे बोलत होत्या.

  • यावेळी तळेगाव शहर भाजपचे अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील,अन्नासाहेब दाभाडे, छबुराव दाभाडे, साहेबराव दाभाडे, हभप ज्ञानेश्वर दाभाडे, नगरसेविका वैशाली दाभाडे, नीलिमा दाभाडे, विशाल दाभाडे, उमेश दाभाडे, आनंद दाभाडे, सुनिता काळोखे,प्राची हेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी स्वाती दाभाडे यांनी यापुढे ही आपण आयएएस, आयपीएस होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांना आपल्या मनोगतांतून शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक पुढारीचे पत्रकार मनोहर दाभाडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.