BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ तळेगाव शहरात महिला कार्यकर्त्यांचा जोरदार प्रचार

0 654
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तळेगाव दाभाडे शहरात घरोघरी जाऊन प्रचार सुरु केला आहे.

येथील निलकंठ नगर, म्हस्करनेस काॅलनी, राव काॅलनी, तुकारामनगर, न्यू आनंद नगर, संभाजीनगर, ढोरवाडा, गंगा रेसिडेन्सी,तळेगाव दाभाडे आदी भागात जाऊन घरोघरी फिरून प्रचार केला. तसेच कोपरा बैठका घेऊन मार्गदर्शन केले.

तळेगाव शहर महिलाध्यक्षा सुनीताताई विजय काळोखे, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस व तळेगाव नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेविका वैशाली दाभाडे, नगरसेविका मंगला भेगडे, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, माजी नगरसेविका तनुजा जगनाडे, तळेगाव शहर महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा ज्योती शिंदे, सरचिटणीस आदिती सोरटे, सारिका सचिन भेगडे, गजभिव मॅडम आदी महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.