Chain snaching : सोमाटणे येथे महिलेचे गंठण पळवले

एमपीसी न्यूज : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील गंठण चोरून नेले.(Chain snaching) ही घटना रविवारी (दि. 25 ) सायंकाळी चौराईनगर रोडवर, सोमाटणे येथे घडली. याप्रकरणी महिलेने अनोळखी चोरट्याच्या विरोधात तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Jayant Patil : मंत्री तानाजी सावंत यांची मस्ती वाढलीय – जयंत पाटील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या घराजवळ थांबल्या (Chain snaching) असताना दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले. तळेगाव-दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.