Talegaon Dabhade : मनकर्णिका महिला महासंघातर्फे महिला दिनानिम्मित सी.आर.पी.एफ. जवानांच्या पत्नींचा सत्कार

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील मस्करनीस कॉलनी दोन येथे शनिवारी (दिनांक 7 मार्च) चौराई वसाहतीच्या मैदानात सी.आर.पी.एफ. जवांनांच्या पत्नींचा सत्कार करून महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळच्या आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके होत्या. यावेळी सीआरपीएफच्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संगीता गायकवाड, जयश्री माळी, शिला टकेकर, इंदुमती वाघमोडे, भाग्यश्री न्हवी, छाया बोरस, रेखा बेले, शिला सुसर आदी सी.आर.पी.एफ. जवानांच्या पत्नींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सी.आर.पी.एफ. च्या जवानांच्या पत्नीचे सत्कार करण्याचे कारण म्हणजे त्यांचे ही समाजासाठी एक योगदान असते. कारण आपण सामान्य महिला सर्वच सण कार्यक्रम वाढदिवस आपल्या पती किंवा कुटुंबासोबत साजरे करतो. पण, या महिलांचे पती प्रत्येकवेळी बरोबरच असतात, असे नाही. एकप्रकारे हा त्यांचा त्याग असतो म्हणून त्यांचे सत्कार करण्यात आले.

मनकर्णिका महिला महासंघाच्या अध्यक्षा संस्थापिका वीणा करंडे म्हणाल्या, “महिलांना रोजच्या दगदगीच्या जीवनातून आनंद मिळावा म्हणून बादलीवर रिंग टाकणे, लिंबू चमचा या स्पर्धा घेण्यात आल्या. लकी ड्रॉ सुद्धा घेण्यात आला. यावेळी नवीन दोन बचत गटांची घोषणा झाली. सारिका ताई शेळके यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

सारिका शेळके, रश्मी शेळके, नगरसेविका संगीता शेळके आदी यांच्या हस्ते सत्कार समारंभ बक्षीस वितरण झाले. लिंबू चमचा स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक सोनाली डोंगरे द्वितीय क्रमांक माया पवार, रिंग टाकणे स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक मीरा शिंगरे व ‘लकी ड्रॉ’ प्रथम सोनाली डोंगरे द्वितीय सुप्रिया पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी कीर्ती पाटील, राधा बनकर, अश्विनी आंबेकर, संगीता गायकवाड, शारदा थोरात, स्वाती पाटील ,सारिका काळोखे, सुवर्णा काळोखे, शितल थोरात, सुलोचना चव्हाण ,वर्षा शिंदे आदींचे सहकार्य लाभले. तसेच यावेळी 90 ते 100 महिलांची उपस्थिती लाभली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.