Talegaon accident: तळेगाव-दाभाडे येथे एका महिलेचा अपघातात मृत्यू

एमपीसी न्यूज:तळेगाव-दाभाडे येथील इंद्रपुरी भागात आज सकाळी एका महिलेचा अपघातात मृत्यू झाला आहे. (Talegaon accident) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व काही प्लॉटधाराकांच्या अनास्थेमुळे येथील रस्ता खराब झाला असून त्यामुळे हा अपघात घडला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

तळेगाव-दाभाडे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार संगीता भोसले, वय 38, रा. मंत्रा सिटी यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्या दुचाकीवरून इंद्रपुरी भागातील रोडवरून जाताना हा अपघात झाला. इंद्रपुरी हा भाग पुणे-मुंबई हायवे शेजारील डोंगरावर वसलेला असून. या डोंगराळ भागात बरेच बंगले व हाउसिंग सोसायट्या आहेत. हा रहिवासी भाग 14 एकर जागेवर वसलेला असून तो तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या पाणी पुरवठा केंद्रा जवळ आहे.

एका संतप्त सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की या भागातून बाहेर जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. त्यापैकी एक रस्ता पुर्ण चिखलमय झाल्याने तो नागरिक वापरू शकत नाहीत तर दुसरा कच्चा रस्ता पावसाचे पाणी वाहत असल्याने निसरडा झाला आहे.(Talegaon accident) मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी घेतलेल्या मीटिंग मध्ये ठरले होते की, प्रत्येक स्थानिक प्लॉटमालक 2 लाख देणार व त्या निधीतून रस्त्याच्या कडेने पाणी व ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात येईल. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हा सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करून देणार.

Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

काहीक प्लॉट धारकांनीच पैसे दिल्याने पाईपलाईन चे काम अर्धवट झाले आहे. उर्वरित प्लॉट धारकांकडून एकूण एक कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे काम रखडलेले आहे. जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण रस्ता तयार करण्याची काम सुरू करू शकत नाही.(Talegaon accident) यामुळे हा कच्चा रस्ता अजूनही आहे. ह्या रस्त्यावरून पावसाळ्यात पाणी वाहत असल्यामुळे सर्व माती वाहून गेली आहे. या खड्डे असलेल्या रस्त्यावर कितीही मुरूम टाकला तरी तो पावसाच्या पाण्याने वाहून जातो. अशा खड्डेमय रस्त्यावरून जाताना झालेल्या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भविष्यात असे अपघात होऊन कुणाचा मृत्यू होऊ नये यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.