Talegaon Women Murder: तळेगाव येथील महिलेच्या खुनाचे अद्याप गूढ कायम

एमपीसी न्यूज: तळेगाव दाभाडे येथे काल झालेल्या महिलेच्या खुन प्रकरणी गूढ अद्याप कायम आहे. संगीता भोसले, वय 38, रा. मंत्रा सिटी, तळेगाव दाभाडे असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे.(Talegaon Women Murder) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात संगीता भोसले यांचा खून करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी व दहा कर्मचाऱ्यांचे एक पथक या खुनाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आले आहे. तसेच गुन्हे शाखा युनिट पाच या खुनाचा समांतर तपास करीत आहे. अशी माहिती नितीन लांडगे, पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे यांनी दिली.

Draupadi Murmu: आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी घेतली राष्ट्रपती मुर्मू यांची सदिच्छा भेट

या खुना मागे चेन स्नॅचिंग हा उद्देश्य असू शकतो का असे विचारले असता, लांडगे म्हणाले की असे वाटत नाही. ते पुढे म्हणाले की काल दिवसभर तळेगाव शहरामध्ये पाऊस असल्याने अज्ञात आरोपीचा गंध पावसाबरोबर वाहून गेला असल्याची दाट शक्यता असल्याने श्वान पथकला बोलावण्यात आले नव्हते.(Talegaon Women Murder) आरोपी अजून अज्ञात आहे. पोलीस  त्याबाबत तपास करत आहेत. काल सकाळी 8.30 वा चे सुमारास इंद्रपुरी येथील भंडारी व्हिला जवळ रस्त्यावर संगीता भोसलेही महिला जखमी अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या सकाळी दूध खरेदीसाठी त्यांच्या दुचाकीवरून दुकानात गेल्या. तेथून इंद्रपुरी येथे राहणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांच्या घरी जात असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने त्यांच्या गळ्यावर वार केले होते.

 

त्यांना जखमी अवस्थेत तळेगाव दाभाडे येथील तळेगाव जनरल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तेथे उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.(Talegaon women Murder) शवविच्छेदनाच्या वेळी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात संगीता भोसले यांचा खून करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.