Talegaon Dabhade : महिलांना मिळाले उद्योग व्यवसायाचे मार्गदर्शन

एमपीसी न्यूज- आपला उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी व उद्योगातून तयार झालेला माल विक्री करण्यासाठी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे महिलांमध्ये व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. निमित्त होते महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तळेगाव दाभाडे परिसरातील सर्व बचतगट आणि सर्वसामान्य महिलांसाठी आयोजित केलेल्या मेळाव्याचे.

महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी तळेगाव दाभाडे आणि परिसरातील सर्व बचत गट आणि महिला भगिनींसाठी माळीआळी येथे रविवारी (दि. १५) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे आयोजन तळेगाव दाभाडे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा ज्योती शिंदे यांनी केले होते.

या मेळाव्यात आपला उद्योग व्यवसाय कसा उभा करू शकतो व उद्योगातून तयार झालेला मालाची विक्री कशी करायची याचे मार्गदर्शन शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मदनजी रेनवडे पाटील यांनी केले.

तसेच लघु उद्योजिका मीनाक्षी काळे यांनी त्यांच्या येथे तयार होणाऱ्या उत्पादनांची माहिती दिली आणि महिला देखील लघुउद्योग कशा प्रकारे चालवू शकतात यावर मार्गदर्शन केले.

या मेळाव्याला तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगरसेविका वैशाली प्रमोद दाभाडे, नगरसेविका मंगल भेगडे, तळेगाव दाभाडे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनिता काळोखे, तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा निशा पवार, उज्वला दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. भविष्यात महिलांसाठी विविध प्रकारचे मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर राबवण्याचा मानस व्यक्त्त केला. महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. प्रास्ताविक उज्वला दळवी यांनी केले तर आभार शिंदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.