Talegaon Dabhade : कार्यकर्त्यांनो, मावळमध्ये भाजपचा गड राखण्यासाठी जीवाचे रान करा – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – कार्यकर्ता ही पक्षाची ताकद आहे.विरोधी पक्षातही कार्यकर्ता अधिक चांगले काम करू शकतो. जमिनीशी जोडलेला कार्यकर्ता ही भाजपची रणनीती आहे. बाजीराव शेटे, मामा शेलार यांच्या कार्यपद्धतीचे आदर्श घ्या. जुन्या आठवणी कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा असतील. पाया भक्कम करा.ग्रामपंचायत निवडणुकीवर लक्ष ठेवा, ग्रामपंचायती जिंका. मावळ तालुका भाजपाचा अभद्य गड राखण्यासाठी जीवाचे रान करा, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले.

तळेगाव दाभाडे येथील हॉटेल ईशा येथे मावळ तालुका भाजपच्या कार्यकारिणी नियुक्तीपत्र वाटप प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले,पक्षाचे संघटन अधिक मजबूत करा.कामाला भरपूर वाव आहे. नियुक्तीस साजेसे असे काम करा. संवाद आणि संपर्क साधून संघटन बांधले जावे.पुणे जिल्ह्यासह मावळ तालुका भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध करण्याची आता वेळ आली आहे.आगामी काळात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर लक्ष केंद्रित करा. पुणे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता येवू शकते.

तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे म्हणाले,भाजपाची वाटचाल ध्येयधोरणा प्रमाणे आहे.कार्यकारिणी निवडताना सर्व ज्येष्ठ आणि आजी – माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तालुक्याचा भौगोलिक ताळमेळ साधत चक्राकार पद्धतीने विविध पदांवर कार्यकर्त्यांच्या नेमणुका केल्या आहेत.यापुढील काळात संघटनेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच भविष्यात निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली जाईल.महिला बचत गट ,शेतकरी बचत गट सक्षम करावेत.

यावेळी माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे , माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी आपल्या मनोगतात म्हणाले,तालुक्याचा सर्वांगिण विकास माजी राज्यमंत्री बाळा भाऊ भेगडे यांनी केला असून त्यांनी तालुक्यासाठी भरीव शासकीय निधी आणला. तालुक्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. स्वागत सुनील चव्हाण यांनी तर प्रस्तावित किरण राक्षे यांनी केले. बाळासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अभिमन्यू शिंदे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.