Talegaon Dabhade : खर्ड्याच्या किल्ल्यावर उभारण्यात येणार जगातील सर्वात उंच भगवा ध्वज; ध्वजाचे तळेगाव दाभाडे शहरात स्वागत

एमपीसी न्यूज – कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून खर्ड्याच्या ऐतिहासिक किल्ल्यात जगातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे. या स्वराज्य ध्वजाचे आज (दि. 29) रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या महिला सरसेनापती सरदार उमाबाई दाभाडे यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या तळेगाव दाभाडे शहरात स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, विरोधी पक्ष नेता गणेश काकडे, माजी उपनगराध्यक्षा, नगरसेविका वैशाली दाभाडे,माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे, नंदकुमार कोतुळकर,संदीप शेळके, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष आशिष खांडगे, उद्योजक सुधाकर शेळके, हर्षद पवार,सुजित दिघे, तालुका उपाध्यक्षा शैलजा काळोखे, सविता मंचरे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुनीता काळोखे, शिवानी सोनवणे, श्रुतिका कांबळे, गोकुळ किरवे आदीजण उपस्थित होते.

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून खर्ड्याच्या ऐतिहासिक किल्ल्यात जगातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे.

खर्ड्याला मराठ्यांनी शेवटची लढाई जिंकली. या दैदिप्यमान पराक्रमाची पताका डौलाने फडकत रहावी यासाठी खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यात शक्ती-भक्ती, एकता व समानतेचं प्रतीक असलेला 74 मीटर इतका देशात सर्वांत उंच भगवा ‘स्वराज्य ध्वज’ उभारण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र आणि भारतातील सर्व गडकिल्ले आणि इतर पवित्रस्थळी या ध्वजाचे स्वागत करण्यात येत आहे, आज दि 29 सप्टेंबर 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या महिला सरसेनापती सरदार उमाबाई दाभाडे साहेब यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या तळेगाव दाभाडे शहर येथे या स्वराज्य ध्वजाचे स्वागत करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.