Talegaon Dabhade : डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवात नामवंत पैलवानांच्या कुस्तीने गाजले मैदान

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवानिमित्त आयोजित कुस्तीच्या आखाड्यात प्रथम क्रमांकाच्या निकाली कुस्तीमध्ये पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीच्या भारत मदने याने पुण्याच्या काका पवार आंतराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा पैलवान शिवराज राक्षे याचा पराभव करीत विजेतेपद प्राप्त केले. या कुस्तीस्पर्धेसाठी जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी हजेरी लावत नवोदित पैलवानांचा उत्साह द्विगुणित केला.

आखाड्याचे पूजन उत्सव समितीचे अध्यक्ष केदार गोरख भेगडे यांच्या हस्ते झाले. आमदार संजय भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, महाराष्ट्र चॅम्पियन तानाजी काळोखे, संभाजी राक्षे, रामनाथ वारींगे यांच्यासह कुस्ती शौकीन मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रथम क्रमांकाच्या निकाली कुस्तीमध्ये पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीच्या भारत मदने याने पुण्याच्या काका पवार आंतराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा पैलवान शिवराज राक्षे याचा पराभव करीत विजेतेपद प्राप्त केले. आमदार संजय भेगडे यांच्या वतीने त्यांना चांदीची गदा देण्यात आली. द्वितीय क्रमांकाची कुस्ती आंतराष्ट्रीय कुस्ती संकुलच्या गणेश जगताप आणि शाहूपुरी तालीम,कोल्हापूरच्या संतोष दोरवड या दोन मल्लांमध्ये झाली. यामध्ये गणेश जगताप हे विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे आणि नगरसेवक संतोष भेगडे यांच्यावतीने त्यांना एक चांदीची गदा देण्यात आली.

यावेळी नामवंत मल्लांच्या सुमारे ७ लाख ५१ हजार रुपये बक्षिसांच्या निकाली कुस्त्या झाल्या. या कुस्त्यांनी कुस्ती शौकिनांचे डोळ्यांचे पारणे फेडले. तालुक्यातील तुषार येवले, दत्ता येवले (आढले), सचिन गायकवाड (चांदखेड), प्रतीक देशमुख (सडवली), सुरेश आडकर(शिवली), केतन मोरे( तळेगाव दाभाडे) या मल्लांनी प्रेक्षणीय कुस्त्या केल्या. कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र चॅम्पियन हिरामण भोंगाडे आणि एड. रवींद्रनाथ दाभाडे यांचा गावकीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. पैलवान किशोर अंबरतात्या दाभाडे (माळवाडी), आणि कुरुळी येथील महिला मल्ल तेजल सोनवणे (देहूगाव तालीम) यांचाही विषेश सत्कार करण्यात आला. पंच म्हणून आमदार बाळा भेगडे, अशोक (अंकल) भेगडे, बाळासाहेब सातकर, बाळतात्या भेगडे, बाळासाहेब सरोदे, राजेंद्र मिरगे, नारायण भेगडे, संभाजी आप्पा भेगडे, शामराव भेगडे, शंकर भेगडे, संभाजी उत्तम भेगडे यांनी काम पाहिले.

सूत्रसंचालन माजी अध्यक्ष गणेश भेगडे, सुनील भेगडे, संतोष भेगडे यांनी केले. आखाड्याचे नियोजन अशोक (अंकल) भेगडे, बाळासाहेब सातकर, राजेंद्र मिरगे, बाळतात्या भेगडे आणि उत्सव समितीने केले. समिती अध्यक्ष केदार भेगडे, सरचिटणीस प्रतीक भेगडे, खजिनदार अविष्कार भेगडे, प्रसिद्धीप्रमुख शुभम काकडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्सवासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like