Talegaon Dabhade : लेखिका सुधा दीक्षित यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील लेखिका सुधा श्रीधर दीक्षित यांचे नुकतेच कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली, सून नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सुधा दीक्षित या मराठीमधील प्रतिथयश लेखिका होत्या. कादंबऱ्या, कवितासंग्रह, नाटके, बालसाहित्य अशा विविध प्रकारात त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. रोटरी क्लब आणि मावळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.