BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : यशोदाबाई भेगडे यांचे निधन

615
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – येथील शेतकरी कुटुंबातील यशोदाबाई जगन्नाथ भेगडे यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी (दि. 19) निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती, मुलगा, विवाहित दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा धार्मिक कार्यांत नेहमी सहभाग असायचा. प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ भेगडे पाटील यांच्या त्या पत्नी तर, नगरसेवक अरुण भेगडे पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

संत तुकाराम कारखान्याच्या संचालिका स्वाती भेगडे पाटील यांच्या त्या सासुबाई, प्रगतिशील शेतकरी खंडू भेगडे पाटील यांच्या त्या चुलती तर, पत्रकार संदीप भेगडे, उद्योजक बिपीन भेगडे, सागर भेगडे, शुभम भेगडे यांच्या त्या आजी होत.

  • बनेश्वर स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी आमदार दिगंबर भेगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पै.चंद्रकांत सातकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबुराव केदारी, तळेगाव शहर भाजपचे अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. यावेळी सामाजिक,राजकीय,धार्मिक, व्यापार, सहकार, कृषी, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3