Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ तालीम मंडळाच्या अध्यक्षपदी योगेश भेगडे, खजिनदारपदी अनिकेत कुंभार, तर, सरचिटणीसपदी यशराज पानसरे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरात विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, देखावे, विविध स्पर्धा , ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज जन्मोत्सव, दहिहंडी इत्यादी माध्यमातून कार्यरत असणाऱ्या तळेगाव नगरीचा मानाचा पहिला गणपती श्री डोळसनाथ तालीम मंडळाची 2019-2020 ची कार्यकारीणी ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर येथे जाहीर करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी योगेश शामराव भेगडे, खजिनदारपदी अनिकेत रामचंद्र कुंभार व सरचिटणीसपदी यशराज बाळासाहेब पानसरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष विश्वनाथ भेगडे, दिनेश सरोदे, मंगेश दाभाडे, मयुर रेडे, विनोद (बंटी) भेगडे, विशाल थिटे , स्वप्निल भेगडे, तुषार साळुंखे आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

  • श्री डोळसनाथ तालीम मंडळाची स्थापना १९०३ साली करण्यात आली असून मंडळ यंदा शतकोत्तर सतराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. श्री डोळसनाथ तालीम मंडळ तळेगाव नगरीचा मानाचा पहिला गणपती.

कार्यकारिणी 2019-2020 पुढीलप्रमाणे : अध्यक्ष : योगेश शामराव भेगडे, उपाध्यक्ष: राज शेळके, बिरू पुजारी , खजिनदार अनिकेत रामचंद्र कुंभार, सहखजिनदार आकाश खंडागळे, शुभम भोसले, सरचिटणीस यशराज बाळासाहेब पानसरे,चिटणीस प्रथमेश हिंगे, कुशल सुरसे, प्रसिद्धीप्रमुख: ॠतिक पिंजण.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.