Talegaon Dabhade News : तळेगाव एमआयडीसीच्या पोलीस निरीक्षकपदी रणजित सावंत

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांच्या जागी पोलीस निरिक्षक रणजित सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रणजित सावंत यांनी पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे आज घेतली आहेत.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांना अपर पोलीस अधीक्षक पदावर बढती मिळाली. त्यांची पदोन्नतीने अपर पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे पदस्थापना करण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाच्या गृह विभागाने 02 डिसेंबर रोजी आदेश दिले आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 16 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये रणजित नारायण सावंत यांची पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्ष ते तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली.

रणजित सावंत यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार घेतला आहे. याबद्दल त्यांचे तालुका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व उद्योजक रामनाथ वारींगे,माजी सरपंच ज्ञानेश्वर मांडेकर, उद्योजक प्रफुल्ल शिंदे,पोलीस पाटील भानुदास दरेकर, आंबळे विविध कार्यकारी विकास संस्थेचे सचिव दत्तात्रय वारींगे, उद्योजक प्रदीप कलावडे,पत्रकार प्रभाकर तुमकर आदींनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.