Talegaon Dabhade : अॅड. श्रीराम कुबेर आणि सुनील कारंडे यांचा स्वीकृत सदस्यपदाचा राजीनामा

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत सदस्य अॅड श्रीराम कुबेर आणि जनसेवा विकास समितीचे स्वीकृत सदस्य सुनील कारंडे यांनी आपल्या स्वीकृत सदस्यपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी,पुणे नवल किशोर राम यांचेकडे सोमवारी (दि.15) सादर केला. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे विशेष सर्वसाधारण सभेत जाहीर केले होते.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. त्या सभेत अॅड श्रीराम कुबेर आणि सुनील कारंडे यांनी आपण आपल्या स्वीकृत सदस्य पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांचेकडे देणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांनी सोमवारी (दि.15) आपला राजीनामा जिल्हाधिकारी,पुणे नवल किशोर राम यांचेकडे सुपूर्द केला. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचना आवारे आदीच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना कुबेर आणि कारंडे यांनी एक वर्षाच्या कामाचा आढावा व्यक्त केला. पक्षाने दिलेली जबाबदारी व्यवस्थित पणे पार पाडली असून इतर कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून ठरलेल्या वेळेतच राजीनामा दिला असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.