Talegaon : तळेगाव स्टेशन येथील कोविड केअर सेंटरचे लोकार्पण

Dedication of Kovid Care Center at Talegaon Station : तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये 60  बेडचे कोविड केअर सेंटर

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे तळेगाव स्टेशन येथील तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये 60  बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज बुधवारी ( दि. २९ ) हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक निकम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, हॉस्पिटलचे चेअरमन शैलेश शाह, संचालक चंद्रभान खळदे, रामदास काकडे, डॉ. शाळीग्राम भंडारी, विनायक अभ्यंकर, डॉ. स्वाधीन ढाकणे, डॉ. माधुरी ढाकणे, डॉ. मिलिंद निकम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत लोहारे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस आदी उपस्थित होते.

?

मावळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढत असल्यामुळे तळेगाव येथे कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या घरी बैठक पार पडली.

यावेळी सर्वानुमते तळेगाव जनरल हॉस्पिटल कोविड केअर सेंटरसाठी ठरवण्यात आले. या तळेगाव येथील कोविड केअर सेंटरची उभारणी करून आज बुधवार ( दि. 29 ) उदघाटन समारंभ संपन्न झाला.

कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण उपचारासाठी आल्यानंतर त्यांना चांगली सेवा द्यावी, असे शैलेश शाह यांनी सांगितले. तसेच हॉस्पिटल मध्ये व्हेंटिलेटर सुविधा, ॲम्बुलन्स सुविधा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

तहसीलदार मधुसूदन बर्गे म्हणाले, मावळ तालुक्यातील जास्तीत जास्त स्थानिकांसाठी या कोविड केअर सेंटरमध्ये प्रवेश देऊन उपचार करण्यात यावेत.

यावेळी प्रास्ताविक शैलेश शाह यांनी केले. उद्योजक किशोर आवारे, चंद्रभान खळदे यांनी मनोगत व्यक्त करून सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.