Talegaon : हिंदमाता भुयारी मार्ग येथे बोटिंग व्यवसाय सुरु करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे हिंदमाता भुयारी मार्ग येथे बोटिंग व्यवसाय सुरु करण्यात यावा, अशी मागणी मनसेचे तळेगावचे शहराध्यक्ष राहूल मांजरेकर यांनी तळेगावचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, जो हिंदमाता भुका सहा नळणी स्टेशन रस्ता वाहतूककोंडी वाचवण्यासाठी केला होता, तो आता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. नागरिकांची गैरसोय होत आहे. ह्या भुयारी मार्गासाठी दहा कोटी ३५ लाख खर्च झाला असून त्याचा फायदा नागरिकांना झाला पाहिजे. कारण ते पैसे नागरिकांचे असून प्रशासनाचे नाहीत.

  • तेथे आपण भुयारी मार्ग नाही तर लोकांसाठी बोटिंग पर्याय म्हणून चालू करावे. ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिले आहे. आपले इंजिनीयर यांचे निकृष्ट काम केले असून त्यांचे लायसन आणि प्रशासन इंजिनिअरिंगचा राजीनामा घ्यावा. मनसे आपल्याला सात दिवस देत आहे. त्यानंतर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, त्याला आपण जबाबदार राहाल, असा इशाराही दिला. यावेळी तालुका अध्यक्ष सागर सुतार, उपाध्यक्ष सचिन बिराजदार, संघटक सतीश शिंदे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.