Talegaon : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फळ झाडे भेट, वृक्षारोपण, सॅनिटायझर वाटप

Deputy Chief Minister Ajit Pawar's Birthday Fruit Tree Gift, Tree Planting, Sanitizer Distribution : उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे व महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनिता काळोखे यांच्या हस्ते वृक्षारोपण

एमपीसीन्यूज : राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त नवीन समर्थ विद्यालय येथील ‘फुलपाखरू’ उद्यानाला तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली प्रमोद दाभाडे यांच्यावतीने 61 फळ झाडे भेट देण्यात आली.

या वेळी तळेगाव महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे व महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनिता काळोखे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुनीता काळोखे यांच्यावतीने तळेगांव दाभाडे नगरपरिषदेच्या शाळांना सॅनिटायझर व सॅनिटायझर स्टँड देण्यात आले.

विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गणेश काकडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुनीता काळोखे, नगरसेविका मंगल भेगडे, नगरसेविका संगीता शेळके, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षा शैलजा काळोखे, सरचिटणीस वीणा कारंडे, शहर उपाध्यक्षा ज्योती शिंदे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा निशा पवार, उपाध्यक्षा शिवानी सोनवणे, सरचिटणीस अदिती सोरटे, रेखा दरेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आशिष खांडगे, नवीन समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास पारधी, पर्यवेक्षक बाबाराव आंभोरे, संजय कसाबी यांच्यासह शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी कैलास पारधी, बाबाराव आंभोरे, संजय कसाबी यांनी मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.