Talegaon : आंबी गावातील दारूभट्टी गुन्हे शाखेकडून उद्ध्वस्त

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या आंबी गावातील दारूभट्टी गुहे शाखा युनिट पाचच्या पथकाने उद्ध्वस्त केली. भट्टीवर छापा मारत पोलिसांनी 90 हजार रुपये किमतीचे 1 हजार 800 मिलीलीटर रसायन आणि नऊ पत्र्याचे बॅरल नष्ट केले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबी गावाच्या हद्दीमध्ये ओढ्या किनारी देशी दारू बनविण्याची भट्टी असल्याची माहिती युनिट पाचचे पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरात छापा मारला. ओढ्याजवळ मोठ्या प्रमाणात बेकायदा दारू बनविण्याचे काम सुरु असल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच भट्टी चालविणाऱ्या महिला व पुरुष आरोपीने पळ काढला. पोलिसांनी पथकाच्या मदतीने नऊ पत्र्याचे बॅरल भरलेले 90 हजार रुपये किमतीचे 1 हजार 800 मिलीलीटर रसायन नष्ट केले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर, पोलीस कर्मचारी फारुख मुल्ला, मयूर वाडकर, धनराज किरनाळे, संदीप ठाकरे, स्वामीनाथ जाधव, धनंजय भोसले, राजकुमार इधारे, दत्ततत्र्य बनसुडे, भरत माने, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गट्टे, दयानंद खेडेकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like