Talegaon Dabhade : संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेत आरोग्य शिबिर उत्साहात

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व नागरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे (Talegaon Dhabhade) येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक 06 (गुलाबी शाळा) येथे मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर व मोफत औषधोपचार वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा रजनीगंधा संतोष खाडंगे उपस्थित होत्या. तसेच रो.डॉ. सुरभी नागरे यांचे विद्यार्थिनींना आरोग्यावर मार्गदर्शन (Talegaon Dhabhade) होते.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रकल्पप्रमुख रो. डाॅ.सुरभी नागरे यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यायची या विषयावर मार्गदर्शन करून तपासणी केली व त्यानुसार औषधे दिली. हिमोग्लोबीन तपासणी तळेगाव जनरल हॉस्पिटलचे वतीने सहप्रकल्प प्रमुख रो.रूथ सालेर यांनी केली. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी.चे अध्यक्ष रो.विन्सेंट सालेर यांनी यापुढेही अशा कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी.चे संस्थापक अध्यक्ष मा.रो.संतोष खाडंगे याच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. बाळासाहेब शिंदे यांनी, आभारप्रदर्शन रो.दशरथ जांभुळकर,सुत्रसंचालन निकीता शितोळे यांनी केले. रो.अंतोष मालपोटे, रो.योगेश शिंदे, रो.डॉ. नितीन नागरे, रो.डॉ.युवराज बढे, सचिव रो.मिलिंद शेलार, रो.सुवर्णा मते, रो. अश्रिता कोळवणकर, रो.सुषमा गराडे, रो.सचिन कोळवणकरसह सर्व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे पदाधिकारी व सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.