Talegaon : पार्थ पवार यांच्यावतीने मावळ तालुक्यात 2700 लिटर सॅनिटायझरचे वाटप

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तीं, नगरपरिषद, कॅन्टोन्मेट बोर्ड, पोलीस स्टेशन, सर्व ग्रामपंचायती आदींना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्याकडून 2700 लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आल्याची माहिती मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी दिली.

आमदार सुनील शेळके, मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या हस्ते सुपूर्द तळेगाव नगरपरिषदेसाठी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याकडे 100 लिटर सॅनिटायझर सुपूर्द करण्यात  आले.

यावेळी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेवक संतोष भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष करण कोकणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष सुनील दाभाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तळेगाव शहर अध्यक्ष आशिष खांडगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नवनाथ चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्याचबरोबर मावळ तालुक्यातील वडगाव नगरपंचायत, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड, लोणावळा नगरपरिषद देहू ग्रामपंचायत, आदींना प्रत्येकी 100 लिटर सॅनिटायझर व तालुक्यातील 105 ग्रामपंचायती पैकी छोट्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 10 लिटर व मोठ्या ग्रामपंचायतीना 20 लिटर सॅनिटायझर व तालुक्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला प्रत्येकी 50 लिटर प्रमाणे सर्व पोलिस स्टेशनमध्ये वाटप केले.

यावेळी कॅन्टोन्मेट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे देहूरोड शहर अध्यक्ष अॅड कृष्णा दाभोळे, प्रवीण झेंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तळेगाव शहर अध्यक्ष गणेश काकडे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, कामशेतचे माजी सरपंच तानाजी दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोणावळा शहर अध्यक्ष जीवन गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकुले आदी उपस्थितीत होते.

मावळ तालुक्यात सॅनिटायझर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांचे मावळवासियांच्या वतीने आभार मानण्यात आले. तसेच त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून,त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील भविष्य काळात अधिक गतीने काम करू, असा आशावाद राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी यावेळी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.