Talegaon : रोटरी सिटीच्या वतीने सॅनिटायझर फूटरेस्ट उपकरणांचे वाटप

Distribution of Sanitizer Footrest Equipment on behalf of Rotary City

तळेगाव दाभाडे – रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या ‌वतीने तळेगाव दाभाडे ‌येथील नवीन समर्थ विद्यालयात सोशल डिस्टन्स व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या सहा माध्यमिक, दोन प्राथमिक शाळांना व ज्युनिअर कॉलेजला सॅनिटायझर फूटरेस्ट उपकरण व सॅनिटायझर बाॅक्सचे वाटप करण्यात आले.

हे साहित्य रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष संतोष शेळके, सेक्रेटरी दिपक फल्ले, संजय मेहता, रोट्रॅक्ट अध्यक्ष प्रतिक माने, सेक्रेटरी वैभव तनपुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

रोटरी पदाधिकाऱ्यांचे स्वागत पर्यवेक्षक बाबाराव अंभोरे ‌यांनी केले. मुख्याध्यापक कैलास पारधी यांच्या हस्ते पाहुण्यांचा रोपं देऊन सत्कार करण्यात आला.

प्रकल्प प्रमुख भगवान शिंदे यांनी प्रास्ताविकाद्वारे रोटरीच्या सेवाभावी कार्याचा आढावा घेतला.

मावळ तालुक्यातील सामाजिक, धार्मिक कामांबरोबर शैक्षणिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय उपक्रम राबविण्याचा मनोदय अध्यक्ष संतोष शेळके यांनी व्यक्त केला तर रोटरीच्या माध्यमातून या वर्षी अभिनव कामकाज करण्याचे सेक्रेटरी दिपक फल्ले यांनी सांगितले.

संजय मेहता यांनी रोटरी कार्यपद्धतीची माहिती विशद केली. सूत्रसंचालन समर्थ विद्यालयाचे ज्येष्ठ अध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले. राजू कडलग, पलक छाजेड, उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक कैलास पारधी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.