BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : माळवाडीत उद्या जिल्हास्तरीय किकबॉक्सींग निवड चाचणी स्पर्धा

एमपीसी न्यूज – सुनील नाना भोंगाडे आणि दाभाडे मार्शल आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने 34 वी पुणे शहर व ग्रामीण जिल्हास्तरीय किकबॉक्सींग निवड चाचणी स्पर्धा रविवारी (दि. 4 ऑगस्ट 2019 रोजी) सकाळी अकरा वाजता, माऊली मंगल कार्यालय, माळवाडी या ठिकाणी आयोजित केली आहे.

स्पर्धेचे उदघाटन ज्येष्ठ नेते, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे यांच्या हस्ते होणार असून वाको महाराष्ट्र, वाको पुणे शहर व ग्रामीण किकबाॅक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

  • याप्रसंगी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे, मावळ तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश काकडे, तळेगाव शहर भाजपचे शहर अध्यक्ष संतोष दाभाडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे, नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेत विविध तालुक्यातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे नियोजन मावळ विधानसभेचे कार्याध्यक्ष सुनील नाना भोंगाडे आणि दाभाडे मार्शल आर्ट्सचे मुख्य प्रशिक्षक सुभाष दाभाडे हे करणार आहेत. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like