Talegaon: डॉ. आंबेडकर यांच्या बंगल्याच्या सद्यस्थितीची आमदार शेळके यांच्याकडून पाहणी

Talegaon: Dr. MLA Shelke inspects the current condition of Ambedkar's bungalow या वास्तूचे दुरुस्ती, सुशोभीकरण, पुनरुज्जीवन, संवर्धन करण्याचे काम राज्य शासनामार्फत 1 कोटी 11 लाख 76 हजार निधी उपलब्ध झाला आहे.

एमपीसी न्यूज – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याच्या स्मृती जतन करणाऱ्या तळेगाव दाभाडे येथील बंगल्यास आज मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भेट देऊन सद्यस्थितीची पाहणी केली.

या वास्तूचे दुरुस्ती, सुशोभीकरण, पुनरुज्जीवन, संवर्धन करण्याचे काम राज्य शासनामार्फत लवकरच चालू करण्यात येणार असून त्यासाठी 1 कोटी 11 लाख 76 हजार निधी उपलब्ध झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत पुढील कामासंदर्भात चर्चा यावेळी झाली.

तळेगाव दाभाडे येथील या वास्तूत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे १९४९ ते १९५६ काळात वास्तव्य होते. ही वास्तू म्हणजे साऱ्या देशवासीयांचे प्रेरणास्थान आहे. डॉ.बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांची ही वास्तू साक्षीदार आहे. ज्या महामानवाने समाजाला अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुध्द लढण्यासाठी भाषणांच्या, विचारांच्या, सत्याग्रहाच्या माध्यमातून अखंड प्रबोधन केले. त्या महामानवाच्या, क्रांतीसूर्याच्या वास्तव्याने पावन झालेल्या वास्तूच्या स्मृती जतन केल्या गेल्या पाहिजेत.

“डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांसाठीच एक प्रेरणास्त्रोत व ऊर्जास्रोत आहेत. अशा वास्तुंचे  संवर्धन, पुनरुज्जीवन केले गेले तर त्यांचे कार्य, त्यांचे विचार नव्या पिढीसाठी अमुल्य ठेवा ठरणार आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने, सहवासाने पावन झालेल्या या वास्तूचे प्रेरणादायी स्मारकात रुपांतर व्हावे यासाठी मी प्रयत्नशील असेल आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझी ती जबाबदारी आहे असे शेळके यांनी सांगितले.

यावेळी आमदार सुनील शेळके, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षा ॲड.रंजनाताई भोसले तसेच इतर पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता वैशाली भुजबळ, अभियंता रावसाहेब पाटील, जेष्ठ पत्रकार अमिन खान, संदीप गराडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.