Talegaon : तळेगाव एसटी बसस्थानक येथे ‘डफली बजाव’ आंदोलन

आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. : 'Duffly Bajaw' agitation at Talegaon ST bus stand

एमपीसीन्यूज : लाॅकडाऊनच्या काळात बंद करण्यात आलेली एसटी तसेच शहरातील सर्व प्रकारची सार्वजनिक परिवहन सेवा सुरू करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार बुधवारी (दि.१२) एसटी महामंडळाच्या तळेगाव स्टेशन येथील बस स्थानकावर डफली बजाव आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व भारिप, वंचित बहुजन महिला आघाडीच्या मावळ तालुका अध्यक्ष संगिता कदम आणि वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका अध्यक्ष कैलास साबळे यांनी केले.

यावेळी तळेगाव शहरासह मावळ तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संगीता कदम आणि कैलास साबळे यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले.

‘एसटी सेवा सुरू करा, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, मोदी हटाव, देश बचाव’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात संतोष लोखंडे, रमेश ओव्हाळ, मंदा गायकवाड, सुनिल वाघमारे, मनोहर सोनवणे, संजय शिंदे, अंजली रणपिसे, बंटी गायकवाड, राजू गायकवाड, अनिल गायकवाड, करण भालेराव, अक्षय कांबळे यांच्यासह तालुक्यातील महिला, युवक व कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान, वडगाव मावळ तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.