Talegaon : ‘एमपीसी न्यूज’च्या नावाने व्हायरल होणारा ‘तो’ मेसेज ‘फेक’; वाचकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये

एमपीसी न्यूज – सध्या एमपीसी न्यूजचा लोगो वापरून तळेगाव दाभाडे परिसरात कोरोना रुग्णासंदर्भातील एक इंग्रजीमधील मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तो मेसेज फेक आहे. त्यावर वाचकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन एमपीसी न्यूजकडून करण्यात आले आहे.

खोडसाळपणे चुकीचा संदेश व्हायरल करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. एमपीसी न्यूज हे पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील घडामोडींची माहिती देणारे अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे. व्हायरल होणाऱ्या या मेसेजमध्ये इंग्रजी भाषेत मजकूर देण्यात आला आहे. एमपीसी न्यूज हे मराठी भाषेतून आपली सेवा देत आहे.

व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजमध्ये वापरण्यात आलेला एमपीसी न्यूजचा लोगो अतिशय जुना आहे. त्याचा वापर कुठेही केला जात नाही. त्यामुळे वाचकांनी व्हायरल होणाऱ्या खोट्या मेसेजवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, खोडसाळपणे मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर एमपीसी न्यूजकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.