Talegaon : लिंबफाटा येथे भीषण अपघात

एमपीसी न्यूज – जुना पुणे मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथे लिंब फाट्यावर ( Talegaon ) आहेत.एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. 29) मध्यरात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जुना पुणे मुंबई महामार्गावरून वडगावकडून देहूरोडच्या दिशेने भरधाव वेगात एक दुचाकी जात होती. मध्यरात्री दुचाकी लिंब फाटा येथे आली असता तिथे देहूरोडकडून तळेगाव दाभाडे शहराकडे जाणाऱ्या एका वाहनाला भरधाव दुचाकीची जोरात धडक बसली. यामध्ये दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Chakan : चाकण परिसरात बेकायदा प्लॉटिंगचा सुळसुळाट… प्रशासनातील मंडळींच भागीदार !

दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून अन्य तिघेजण या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर अनोळखी वाहन घटना स्थळावरून निघून गेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत  ( Talegaon ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.