Talegaon : टपरीची तोडफोड करून पेटवल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चेहऱ्यावर मास्क बांधून आलेल्या चार अनोळखी इसमांनी टपरीची तोडफोड केली. तसेच टपरीवर रॉकेल ओतून पेटवून दिली. ही घटना सोमवारी (दि. 9) पहाटे साडेतीनच्या सुमारास इंदोरी येथे घडली.

केदार लक्ष्मण हिंगे (वय 27, रा. इंदोरी, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदोरी गावात केदार यांची निसर्ग पानटपरी आहे. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास चार अनोळखी आरोपी चेहऱ्यावर मास्क बांधून आले. त्यांनी केदार यांच्या टपरीची लाकडी दांडक्याने तोडफोड केली. त्यानंतर टपरीवर रॉकेल ओतून पेटवून देत केदार यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.