Talegaon : यशवंत प्रतिष्ठानचे विलास भेगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथील यशवंत प्रतिष्ठनचे ध्वजारोहण तळेगाव दाभाडे प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष विलास भेगडे यांच्या हस्ते झाले.

यावेळी पत्रकार संदीप भेगडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संविद पाटील, सचिव अनिता धारके, खजिनदार सचिन मोने यांच्यासह प्रतिष्ठाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संविद पाटील यांनी स्वागत केले. पाटील यांनी प्रतिष्ठान राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विलास भेगडे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठान राबवित असलेल्या स्तुत्य उपक्रमाचे भेगडे यांनी कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.