Talegaon : मावळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासकीय निर्देशांचे पालन करा: जिल्हाधिकारी

Follow the government's instructions to prevent the spread of corona in Mavla: Collector

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडेसह मावळ तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून शासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहामध्ये कोरोनाबाबतच्या आढावा बैठकीमध्ये जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसुदन बर्गे, गटविकास अधिकारी एस. पी. भागवत, तालुका आरोग्याधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे, लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन पवार, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड, वडगाव नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, मायमरचे डॉ. दिलीप भोगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, तळेगाव प्राथमिक केंद्राचे आरोग्य प्रमुख डॉ. प्रवीण कानडे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटेसह शासकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स यांच्याकडून मावळ तालुक्यातील कोविड -19 साठी उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची तसेच संस्थात्मक विलगीकरण कक्षासाठी किती ठिकाणी नियोजन केले आहे, याची माहिती घेतली. तेथे असणाऱ्या सोयीसुविधा कशाप्रकारे आहेत , त्या चांगल्या राहाव्यात म्हणून संबंधित व्यवस्थापनाला जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.

तसेच कोरोना जनजागृतीसाठी नागरिकांना प्रबोधन करणे.  प्रभागनिहाय स्वयंसेवकांची नेमणूक करणे. सलून दुकान व शासनाने नव्याने परवानगी व्यवसाय व आस्थापनामध्ये शासकीय नियमांचे पालन होते का नाही याची पाहणी करणे.  त्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करणे.  खासगी रूग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून बिलाची तक्रार आल्यास त्याची पाहणी करणे, आदी सूचना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मावळ तालुक्यांमध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून करण्यात येत असलेल्या स्थानिक प्रशासनाच्या नियोजनाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

तसेच आमदार सुनील शेळके यांनी दवाखान्याबाहेर कोरोना रुग्णांवर उपचाराबाबात येणाऱ्या बिलाचा चार्ट लावावा, अशी सूचना केली.

आढावा बैठकीनंतर उपस्थित सर्वांनी तळेगावातील कोरोनमुक्त झालेल्या रुग्णांना तसेच कोविडी-19 वर उपचार करणाऱ्या रुग्णालयास व संस्थात्मक विलगीकरण कक्ष असलेल्या ठिकाणांना भेटी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like