Talegaon : कपड्यांच्या दुकानातून चार लाखांचे टीशर्ट, जीन्स पॅन्ट चोरीला

एमपीसी न्यूज – तळेगावमधील वराळे गावातील एका कपड्याच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 3 लाख 94 हजार रुपयांचे टीशर्ट आणि जीन्स पॅन्ट आणि 6 हजार 210 रुपये चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 5) सकाळी उघडकीस आली.

सदंश विश्वनाथ हात्तुरे (वय 33, रा. वराळे गाव, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदंश यांचे वराळे गावात कपड्यांचे दुकान आहे. सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून 6 हजार 210 रुपयांची रोकड आणि 3 लाख 94 हजार रुपयांचे टीशर्ट आणि जीन्स पॅन्ट चोरून नेल्या.

सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास सदंश दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.