Pimpri : डॉक्टर सुनेचा छळ केल्याप्रकरणी डॉक्टर पतीसह चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – डॉक्टर असलेल्या सुनेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी डॉक्टर पती, डॉक्टर सासरा, सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मे 2013 ते डिसेंबर 2019 या कालावधीत  तळेगाव दाभाडे येथे घडली.

याप्रकरणी 34 वर्षीय डॉ. सुनेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती डॉ. रोहित दिलीप भोगे, सासरे डॉ. दिलीप प्रतापराव भोगे, सासू उषा दिलीप भोगे (सर्व रा. तुळजाभवानी सोसायटी,  चाकण रोड,  तळेगाव स्टेशन) आणि नणंद निलांबरी विक्रम साळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित डॉक्टर सुनेचा सासरच्या मंडळींनी घरगुती कारणावरून वाद घालून शिवीगाळ करणे, मारहाण करणे, माहेरहून पैसे आणण्यासाठी धमकावणे, उपाशी ठेवणे, इतरांसमोर अपमान करून मानसिक छळ करणे आणि आजारी असताना वैद्यकीय मदत न पुरवता मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.