Talegaon : दोन हजार बांधकाम मजुरांना राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते सुरक्षा संचचे मोफत वाटप

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बांधकाम कामगारांना सुरक्षा संचचे वाटप केले. एका संचाची किंमत सुमारे 12 हजार रुपये असून असे दोन हजार संच मोफत वाटण्यात आले आहेत. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते हे वितरण केले.

मावळ तालुक्यात 2 हजार 160 कामगारांच्या बँक खात्यावर पाच हजार रुपयांचा पहिला हफ्ता जमा झाला आहे. उर्वरित बांधकाम मजूर लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या आठवड्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. बांधकाम मजूर ज्या बांधकाम साईटवर काम करतात. त्यांच्या सुरक्षतेसाठी 12 हजार रुपये किंमतीचे मोफत सुरक्षा संच वाटप करण्यात आले आहेत.

  • नोंदणी झालेल्या कामगारांच्या पाल्यांना इयत्ता चौथी ते सातवी, आठवी ते दहावी व इयत्ता अकरावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनुक्रमे आडीच, पाच व दहा हजाराचे धनादेश देण्यात आले.

तालुक्यातील बांधकाम कामगारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात आलेली आहे. या नोंदणी झालेल्या कामगारांना शासनाकडून शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक व सुरक्षा विषयक विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षितता देण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.