Talegaon : राम मंदिर भूमिपूजनानिमित्त दोन हजार किलो तांदळाचे मोफत वाटप

अमर हिंद मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष व युवा उद्योजक अनिल ठाकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी : Free distribution of two thousand kilos of rice on the occasion of Ram Mandir Bhumi Pujan

एमपीसीन्यूज : तळेगाव स्टेशन येथील अमर हिंद मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष व युवा उद्योजक अनिल ठाकर यांनी राममंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून नागरिकांना 2000 किलो तांदूळ वाटप करण्यात आले.

तळेगाव शहरातील रिक्षाचालक, वाहतूक नियमन सहाय्यक आणि नागरिकांना या तांदळाचे मोफत वाटप करण्यात आले. ही धान्यरूपी मदत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

तळेगाव स्टेशन येथील अमरहिंद मित्र मंडळाच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला.

उद्योजक किशोर आवारे, इंद्रायणी उद्योग समुहाचे संचालक संतोष शेळके, नगरसेवक संतोष शिंदे, सचिन आरते, विनोद रोहिटे, शेखर खोमणे, राम नाईकरे, नितीन धोत्रे, अमर चव्हाण, सोमा गायकवाड व तळेगांव दाभाडे रिक्षा संघाचे अध्यक्ष दिलीप डोळस आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.