Talegaon : मावळातील फ्लोरिकल्चर शेतकऱ्यांना एकरी 10 ते 15 लाख रुपयांची मदत करा – बाळा भेगडे

Help floriculture farmers in Maval with Rs. 10 to 15 lakhs per acre - Bala Bhegade

एमपीसीन्यूज : निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यातील नुकसान झालेल्या फ्लोरिकल्चर  शेतकऱ्यांना एकरी 10 ते 15 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे  केली आहे. 

निसर्ग चक्रीवादळाच्या अनुषंगाने केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी कोकण व पुणे जिल्हात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांशी सवांद साधला.

त्यामध्ये माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी मावळ व पुणे जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली.

_MPC_DIR_MPU_II

तसेच निसर्ग वादळात उद्धवस्त झालेल्या फ्लोरी कल्चर शेतकऱ्यांना एकरी 10 ते 15लाख रुपये प्रमाणे पॅकेज मिळावे, अशी मागणी केली.

त्यावर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी राज्य सरकारला राज्य आपत्ती निवारण निधी, राज्य सरकारला सुपूर्द केला असून केंद्रीय आपत्ती निवारण निधीसाठी राज्यसरकारने केंद्राला योग्य तो प्रस्ताव पाठवावा. त्या नुसार मदतीसाठी कार्यवाही करण्यात येईल, असे भेगडे यांना आश्वस्त केले.

या संवाद कार्यक्रमात प्रामुख्याने केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, केंद्रीय सहसंघटन मंत्री वीर सतीशजी,संघटन मंत्री विजयराव पुराणिक, विनोद तावडे, खासदार विनायक सहस्त्रबुद्धे आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, आमदार प्रशांत ठाकूर,आमदार प्रसाद लाड,आदी प्रमुख नेत्यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.