Talegaon : हेमलता शहा यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (Talegaon) येथील शहा ज्वेलर्स या सुवर्णपेढीच्या संचालिका हेमलता अशोक शहा (वय 74) यांचे आज (बुधवार) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्या मागे समीर व सागर हे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. शहा ज्वेलर्सचे मालक सागर शहा यांच्या त्या मातोश्री तर तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती दिलीपभाई शहा यांच्या त्या वहिनी होत.

Dehuroad : महिना एक लाख रुपये देतो सांगून तीन लाखांना लुटले

हेमलता शहा यांच्या पार्थिवावर (Talegaon) आज दुपारी चार वाजता तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.