Talegaon : वादळी पावसाने शेतीसह पॉलिहाऊसचे प्रचंड नुकसान

Huge damage to polyhouses, including agriculture, by torrential rains

तळेगाव दाभाडे- काल, बुधवारी झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे. त्याचबरोबर मोठी झाडे कोसळून झाडाखाली असलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे कोसळल्याने  रस्तेही बराच वेळ बंद राहिले होते.

यामध्ये इंदोरी ( ता. मावळ) येथील शेतकरी दीपक शेवकर यांच्या पॉलिहाऊसचे सुमारे ३ लाखाचे नुकसान झाले आहे. यामध्ये गुलाबाच्या रोपांची लागवड केलेली होती. परंतु, अचानक आलेल्या या वादळाने त्यांचे पॉलिहाऊसचे संपूर्ण शेड उडून जाऊन त्यामध्ये असणाऱ्या पिकांचेही त्यांना नुकसान झाले आहे.

याआधी कोरोनाचे सावट असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना ३ लाखांचे नुकसान झाले होते आणि त्यात आलेल्या या वादळाने तर त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

आत्तापर्यंत सलग तीन महिने कोरोनामुळे प्रचंड नुकसान झाले आहे आणि त्यात चक्रीवादळामुळे त्या नुकसानात आणखी भर पडली आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन आम्हा शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी दीपक शेवकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.